Deglur police arrested a mobile phone thief : देगलुर पोलिसांनी आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्यास अटक करुन चोरीचा गुन्हा केला उघड -NNL
देगलुर/नांदेड| मागील अनेक दिवसापासून देगलुर येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याच्या अनेक तक्राराई पायावरून वरिष्ठांच्या आदेशाने देगलुर पोलिसांनी आठवडी बाजारात पळत ठेऊन मोबाईल चोरणाऱ्यास अटक करुन कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑउट अंतर्गत अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत आणि मागील गुन्हे उघडकीस आनणे बाबत पोलीस निरीक्षक, देगलुर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार मारोती श्रीराम मुंडे, पोलीस निरीक्षक, देगलुर यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना देगलुर शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा आरोपीचा शोध घेणे करीता तात्काळ रवाना केले. गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांनी देगलुर शहरातील आठवडी बाजारात दोन मोबाईल चोरी करणारा आरोपी नामे प्रमोद उर्फ पिंटु श्रीपती सोनकांबळे, वय 39 वर्ष, रा.धडकनाळ, ता. उदगी...

