Shri Hanuman Temple ; श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याचे निमित्ताने तीन दिवशीय धार्मिक कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती

किनवट परमेश्वर पेशवे l दिनांक 12 रोजी पासून तीन दिवसीय कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन इस्लापूर शहरात करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची सांगता दिनांक 14 रोजी हजारो महिलांच्या पुरुषांच्या साक्षीने पूर्णत्वास गेली. त्यानंतर महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो महिला भक्त आणि पुरुषांनी लाभ घेतला.


या कलशारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमाची औचित्य साधून हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर या यांनी आवर्जून भेट दिली असता गावातील ग्रामस्थांनी व स्थानिक च्या कार्यकर्त्यांनी त्यांना इस्लापूर येथील पाणी टंचाई संदर्भात लक्ष देण्याची मागणी केली असता तात्काळ इस्लापूर शहरासाठी तीन टँकर मंजुरी करण्याच्या प्रस्तावास संदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकारी किनवट यांच्याशी त्यांनी चर्चा केली.


त्याचबरोबर गावातील अनेक विकास कामा संदर्भात च्या चर्चा त्यांनी कार्यकर्त्या सोबत करून गावातील अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पांगरी येथील पाझर तलावा संदर्भात सकारात्मक चर्चा खासदार यांच्यासोबत इस्लापूर ग्रामस्थांनी केली.यावेळी हनुमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. व हनुमान ट्रस्टच्या वतीने खासदार नागेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यामध्ये ह भ प चिन्मय महाराज सातारकर यांचे भव्य प्रवचन झाले .


त्यानंतर श्री हनुमान मंदिरात अभिषेक सोहळा संपन्न होऊन बाल स्वयंसेवकाच्या वतीने रामायणावर नाटिका सादर करण्यात आली व शेकडो महिलांनी पुरुषाने सामूहिक हनुमान चालीसाचे पठण केले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . सायंकाळी सौ. ह. भ. प. भगवती सातारकर यांच्या मधुर वाणीतून भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

दिनांक 13 रोजी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य कलश नगर प्रदक्षिणा व रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. रात्री आठ ते दहा ह भ प सुरेश महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला असून दिनांक 14 रोजी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी व आया बहिणींनी सकाळी 9 ते 11 वाजता श्री हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थिती दर्शविली .
या कलशार्रोहण सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक 14 रोजी वारकरी भूषण ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या मधुर वाणीतून काल्याचा किर्तन सोहळा व महाप्रसादाचा मुख्य आयोजन याच दिवशी करण्यात आले होते.ह भ प माधव महाराज बोरगडीकर ह भ प बाबुराव महाराज आंबेगावकर ह भ प पंजाब महाराज चालगणी कर ह भ प ज्ञानेश्वर महाराज बोरगडीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली या कलशारोहण सोहळ्यास माहेरघरच्या सुवासिनी लेकी या हजारोच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.



