नांदेड| नाथ नगर येथील रहिवाशी, जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका आरोग्य विभाग येथे आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत असलेले गिरीश श्रीपतराव पाटील (47 वर्ष ) यांना आज दि. 27 ऑगस्ट रोजी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.


अंत्यविधी उद्या दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.भोकर फाटा जवळ बारसगाव शिवार येथील त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीपतराव पाटील कामजळगा ता. मुखेड यांचे जेष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहीण, भावजय असा परिवार आहे.




