HomeनांदेडDr. Hansraj Vaidya : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन...

Dr. Hansraj Vaidya : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे – डॉ. हंसराज वैद्य -NNL

नांदेड| सातत्याने चालणारा कायापालट सारखा उपक्रम भारतात कुठेही होत नसल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे असे प्रतिपादन नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य यांनी केले.पन्नासाव्या महिन्याच्या उपक्रमात ५२ भ्रमिष्टांना डॉ. वैद्य यांच्या हस्ते कपडे व शंभर रुपयाची बक्षीसी देऊन कायापालट करण्यात आला.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गोवर्धन घाट येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी सदिच्छा भेट दिली. या उपक्रमाची डॉ. वैद्य यांनी विस्तृतपणे माहिती घेतली.कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम कधी रद्द झाला नाही.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल,ला. शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असते.

Picsart 24 10 08 10 40 15 539 Dr. Hansraj Vaidya : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे - डॉ. हंसराज वैद्य -NNL
 

सोमवारी पहाटे शहरातील विविध भागातून भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना सुरेश शर्मा, कामाजी सरोदे, संजयकुमार गायकवाड यांनी स्वतःच्या दुचाकी वर बसवून गोवर्धन घाट पुलाखाली आणले. स्वयंसेवक राजूअण्णा पस्पुनुर यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना विलास जोगदंड यांने साबण लावून स्नान घातले.त्यानंतर नवीन अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट वाटप करण्यात आले.ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था केली होती.

पूर्वीचे मळके कपडे,अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून सर्वजण हरखुन गेले.डॉ.अर्जुन मापारे व डॉ.दि.बा.जोशी यांनी आजारी असलेल्या व्यक्तींची तपासणी केली. जखमांची मलमपट्टी करून मोफत औषधे दिली. कायापालट उपक्रम संपल्यानंतर सुरेश लोट यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराची स्वच्छता करण्यात आली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments