Dr. Hansraj Vaidya : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे – डॉ. हंसराज वैद्य -NNL
नांदेड| सातत्याने चालणारा कायापालट सारखा उपक्रम भारतात कुठेही होत नसल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे असे प्रतिपादन नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य यांनी केले.पन्नासाव्या महिन्याच्या उपक्रमात ५२ भ्रमिष्टांना डॉ. वैद्य यांच्या हस्ते कपडे व शंभर रुपयाची बक्षीसी देऊन कायापालट करण्यात आला.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गोवर्धन घाट येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी सदिच्छा भेट दिली. या उपक्रमाची डॉ. वैद्य यांनी विस्तृतपणे माहिती घेतली.कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम कधी रद्द झाला नाही.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशो...
