Homeक्राईमthief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या...

thief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या बैगेतून 13 हजार केले लंपास

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेत बचत खात्यातून रकम काढल्यानंतर शेतकऱ्याची मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना पाठीमागून एका अनोळखी व्यक्तीने तिच्या बॅगेतील 13000 रुपये लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये बचत खात्यातून शेतकरी शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने 18 हजार रुपये काढले होते. सदरील ही व्यक्ती आपल्या मुलीसह बँकेत आल्याने भाग्यश्री शंकर भडंगे ही मुलगी बँकेतील बचत गटाच्या महिलेशी चर्चा करत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या बॅगेतील 13000 रुपये चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सदरील हि बाब भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक रमेश सवणे यांनी येथील पोलीस स्टेशनला कळवले असता इस्लापूर पोलीसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

IMG 20250228 193921 thief looted 13 thousand : इस्लापूरच्या भारतीय स्टेट बँकेतच चोरट्याने शेतकऱ्याच्या मुलींच्या बैगेतून 13 हजार केले लंपास

शंकर गोविंदराव भडंगे या व्यक्तीने आपल्या सेविंग खात्यातून 18 हजार रुपये काढल्याने सर्व पैसे आपली मुलगी भाग्यश्री शंकर भडांगे या मुलीच्या हातात दिल्याने भाग्यश्री शंकर भडंगे या मुलीने वडिलाला त्या पैशातून पाच हजार रुपये दिले व उर्वरित 13 हजार रुपये बॅग मध्ये ठेवले होते. अवघ्या काही वेळातच माझ्या बॅगची चेन कुली दिसल्याने मी बॅग मध्ये बघितले असता माझ्या बॅग मधले तेरा हजार रुपये कुठल्यातरी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे माझ्या लक्षात आले अशी माहिती भाग्यश्री शंकर भडंगे यांनी यावेळी दिली आहे

भाग्यश्री शंकर भडांगे या मुलीने 18000 रुपये काढले आपल्या वडीलाच्या सेविंग खात्यातून पैसे उचलले होते आणि पाच हजार रुपये वडिलाला दिले बाकीचे 13000 रुपये बॅग मध्ये ठेवले होते. अवघ्या काही वेळातच माझ्या बॅगची चैन खुली दिसल्याने मी बॅग मध्ये बघीतले असता माझ्या बॅगमधले तेरा हजार रुपये कुठल्यातरी अज्ञात चोरट्यानी चोरल्याचे माझ्या लक्षात आले अशी माहिती भाग्यश्री शंकर भडंगे यांनी यावेळी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments