Homeनांदेडscout guide | स्काऊट गाईडच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका...

scout guide | स्काऊट गाईडच्या वतीने बिगिनर्स कोर्स व उजळणी वर्गाचे तालुका निहाय आयोजन – NNL

नांदेड| भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांसाठी स्काऊट गाईड विषया संदर्भात तालुका निहाय बिगीनर्स कोर्स/ उजळणी वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 16-07-2024 पासून या उजळणी वर्गाची सुरुवात लोहा तालुक्यापासून होत आहे.

या उजळणी वर्गामध्ये स्काऊट गाईड विषयाची ऑनलाइन व ऑफलाइन पथक नोंदणी करणे, अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन, राज्य व  राष्ट्रपती पुरस्कार तसेच पंतप्रधान ढाल स्पर्धा, समुदाय विकास कार्यक्रम,संघनायक शिबीर  इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उजळणी वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक,संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, स्काऊट गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊट /गाईड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट/ गाईड जिल्हा आयुक्त स्का/गा, ALT/H.W.B शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

शाळा तेथे कब बुलबुल स्काऊट गाईड पथक सुरू करण्याच्या दृष्टीने परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तारखेला सकाळी 11 ते 4 या वेळेत दिलेल्या ठिकाणी  जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमधून एक शिक्षक /शिक्षिका किंवा  स्काऊट गाईड विषयाचे शिक्षक यांनी उपस्थित राहण्यासाठी पाठविण्यात यावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

अ.क्र तालुका सभा दिनांक                               सभेचे ठिकाण              वेळ
लोहा 16-०7-२०२4 जिल्हा परिषद हायस्कुल, लोहा  

 

 

 

सकाळी

११:०० ते १६:००

            पर्यत

मुखेड 18-०7-२०२4 जिल्हा परिषद हायस्कुल मुलींचे, मुखेड
मुदखेड व अर्धापूर 19-०7-२०२4 स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय,मल्टीपर्पज हायस्कुलच्या मागे नांदेड
नायगाव 22-०7-२०२4 पुज्य साने गुरुजी विद्यालय, देगाव.
बिलोली 23-०7-२०२4 आंतरभारती विद्यालय, बिलोली
धर्माबाद 24-०7-२०२4 गुरुकुल विद्यालय, धर्माबाद
भोकर 26.07.2024 जि. प. क्रे प्रा. शाळा, नुतन भोकर
देगलूर 29-०7-२०२4 जि. प. हायस्कुल, देगलूर
हदगाव 30-०7-२०२4 जि. प. हायस्कुल, हदगाव
१० नांदेड 01-०८-२०२4 स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय,मल्टीपर्पज हायस्कुलच्या मागे नांदेड
११ कंधार 02-०८-२०२4 श्री. शिवाजी हायस्कुल, कंधार
१२ उमरी 06-०८-२०२4 यशवंत हायस्कुल, उमरी
१३ माहुर 07-०8-२०२4 शासकीय आश्रम शाळा,माहुर
१४ किनवट 08-०8-२०२4 सरस्वती विदयामंदीर माध्य व उच्च माध्य विद्यालय,किनवट
१५ हिमायतनगर 13-०8-२०२4 हु.जयवंतराव पाटील कन्या वि.हिमायतनगर

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments