हिमायतनगर, असद मौलाना। शहरातील फुले नगर व सिद्धार्थ नगर भागात मागील काही दिवसांपासून वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे.रात्री उशिरापर्यंत विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे चोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याने येथील नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठून निवेदनाद्वारे विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.


हिमायतनगर शहरांसह फुलेनगर व सिद्धार्थनगर येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून वारंवार यावेळी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने या भागातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पीन्याच्या पाण्याची समस्यचा सामना करावा लागतो आहे, परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोअर मध्ये पाणी असूनही विजेअभावी पाणी मिळत नाही. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या भागात चोरीचे प्रमाणही वाढत आहे.


ही बाब लक्षात घेता महावीतरण विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देवून या भागात विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सिध्दार्थ नगर व फुलेनगर येथील नागरिकांनी महावितरण कार्यालय येथे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे, ज्ञानेश्वर लिंगमपल्ली, जाहीर मिर्झा, सोपान कोळगीर, परमेश्वर जाधव, प्रतीक दारवंडे, दिगंबर अंभोरे, बाबू लोमदे, आदींसह परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


तात्काळ सिद्धार्थ नगर व फुलेनगर या भागात वेळोवेळी होणाऱ्या खंडित विज पुरवठा प्रकार महावितरण विभागाने थांबवावा अन्यथा लोकशाही मार्गाने हिमायतनगर येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ज्ञानेश्वर लिंगमपल्ले यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे.


