Wednesday, May 13

Tag: otherwise citizens are ready to protest

सिध्दार्थनगर व फुलेनगर भागातील विजपुरवठा पूर्ववत करा अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत-NNL

सिध्दार्थनगर व फुलेनगर भागातील विजपुरवठा पूर्ववत करा अन्यथा नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत-NNL

नांदेड
हिमायतनगर, असद मौलाना। शहरातील फुले नगर व सिद्धार्थ नगर भागात मागील काही दिवसांपासून वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे.रात्री उशिरापर्यंत विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे चोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याने येथील नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठून निवेदनाद्वारे विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. हिमायतनगर शहरांसह फुलेनगर व सिद्धार्थनगर येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्यापासून वारंवार यावेळी वीज पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने या भागातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पीन्याच्या पाण्याची समस्यचा सामना करावा लागतो आहे, परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बोअर मध्ये पाणी असूनही विजेअभावी पाणी मिळत नाही....
error: Content is protected !!