Homeनांदेडकिनवट व माहूर तालुक्यात झालेली मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे...

किनवट व माहूर तालुक्यात झालेली मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे निकृष्ट दर्जाची – सुरेश शेंडे यांचा आरोप -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभागीय, किनवट या कार्यालयाचा कारभार चालतो नांदेडहून किनवट व माहूर तालुक्यासाठी हे कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे किनवट व माहूर तालुक्यात मागच्या आर्थिक वर्षात करण्यात आली आहेत. झालेली कामे ही निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेंड यांनी केले आहे.

या कार्यालयात मंजुर पदांची संख्या १७ आहे. परंतु, कार्यरत अधिकारी व कर्मचारी चारच आहेत. यातील दोन अभियंते हे साईटच्या नावाने कार्यालयात न येता नांदेडहूनच काम करतात. या कार्यालयामार्फत करण्यात आलेली कामे ही लोकप्रतिनिधींशी व अधिका-यांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून कंत्राटदारांनी ही कामे केली आहेत. टक्के वारीच्या नादात ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत.

लोकप्रतिनिधिंचा वरदहस्त अधिका-यांना असल्याने या कामाविषयी कितीही तक्रारी झाल्या तरी त्याची दखल घेतली जात नाही. झालेल्या कामांची गुणवत्ता नियंत्रण कार्यालया मार्फत चौकशी करावी व संबंधित दोषी विरुद्ध कडक कार्यवाही करावी अशी मागणी शेंडे यांनी केली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशि भ्रमणध्वनीद्वारे अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असेही शेंडे यांनी सांगितले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments