Homeनांदेडमाहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर...

माहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कारवाई करा -NNL

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यात कपाशी बियाण्याची व कीटकनाशकाची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कृषी दुकानावर कारवाया करावी अन्यथा दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी १० वा. किनवट माहूर रोडवरील वाई बा.फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माहूर तालुका गोरसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकरी बि बियाणे खरेदी करता बाजारात गर्दी करीत आहेत. काही बियाणे वाणास व औषधीस शेतकरी जास्त पसंती देत असल्याने ज्या कपाशी बियाण्याच्या वाणास कीटक नाशकास शेतकऱ्यांची जास्त पसंती त्या वाणाचा कृषी साहित्य विक्रेते जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत असून प्रती पॉकेटवर १००० ते १५०० रुपया पर्यत जास्त मोबदला दिल्यास उपलब्ध करून देत आहेत. शेतकऱ्यांना मूळ किमतीच्या पावत्या देत अवैध पैसे कमावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हवे ते बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे.

तालुक्यातील बहुतांश कृषी केंद्रात साठा दर्शक व भावफलक लावले दिसत नसून कृषी केंद्र चालक हे मनमानीपणाने शेतकरी ज्या कपाशी बियाणे वाण व कीटकनाशकांना शेतकरी जास्त पसंती देतात नेमके त्याच वाणाचा व कीटक नाशकांचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केल्या जात आहे. प्रती बॅग वर १००० ते १५०० रु अतिरिक्त देण्याचे कबूल केल्यास तात्काळ उपलब्ध करून देत आहेत. लाखो रुपयाचा अवैध व्यवहार करीत आहेत. तालुक्यातील दोन्ही तालुका कृषी विभागाचे याबाबीवर नियंत्रण असल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.

माहूर तालुक्यातील कपाशी बियाण्याची व कीटकनाशकाची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कृषी दुकानावर कारवाया करण्यात यावी व गैरप्रकाराला आळा घालावा अन्यथा दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी १० वा. किनवट माहूर रोडवरील वाई बा. फाटा येथे गोर सेना व शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोरसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी गोर सेना माहूर चे माजी तालूकाध्य प्रफुल जाधव, उकंडराव पवार, यादव आडे, संदीप राठोड, संदेश नायक, शंकर चव्हाण, महेंद्र चव्हाण, अमोल शेंडे, कैलास जाधव आदीं पदाधिकारी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments