माहूर तालुक्यात कपाशी बियाणे व कीटकनाशकांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या कृषी संचालकांवर कारवाई करा -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यात कपाशी बियाण्याची व कीटकनाशकाची चढ्या दराने विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कृषी दुकानावर कारवाया करावी अन्यथा दि. १०/०६/२०२४ रोजी सकाळी १० वा. किनवट माहूर रोडवरील वाई बा.फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा माहूर तालुका गोरसेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकरी बि बियाणे खरेदी करता बाजारात गर्दी करीत आहेत. काही बियाणे वाणास व औषधीस शेतकरी जास्त पसंती देत असल्याने ज्या कपाशी बियाण्याच्या वाणास कीटक नाशकास शेतकऱ्यांची जास्त पसंती त्या वाणाचा कृषी साहित्य विक्रेते जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करत असून प्रती पॉकेटवर १००० ते १५०० रुपया पर्यत जास्त मोबदला दिल्यास उपलब्ध करून देत आहेत. शेतकऱ्यांना म...
