Annabhau Sathe | कॉ.डॉ.अण्णा भाऊंना जयंती दिनी अभिवादन; निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन -NNL

नांदेड। चळवळीचं केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती दिनी अण्णा भाऊंच्या मुख्य पूर्णाकृती पुतळा येथील ध्वजारोहन नांदेडचे निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निवडणूक आयोगात काम असल्यामुळे ते नांदेड मध्ये नव्हते म्हणून आरडीसी यांनी लाल बावटाचे ध्वजारोहन केले.

जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या जयंतीत पहिल्यांदाच हा योग आला. निमंत्रित पाहुणे असल्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या सह विविध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दुपारी दोन वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्या कार्यक्रमाचे उदघाटक माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे तर अध्यक्षस्थानी डॉ. सुनिल कदम यांची उपस्थिती होती.प् जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांनी प्रस्ताविक केले तर
प्रा.डॉ. दयाराम द.मस्के आणि कॉ. उज्वला पडलवार यांचे व्याख्यान झाले. प्रा.डॉ.मस्के यांनी मातंग समाजाची सद्यस्थिती,आव्हाने व उपाय योजना तर कॉ.पडलवार यांनी कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे यांची चळवळ आणि विचार या विषयावर व्याख्यान झाले.

शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. व्यंकटेशवरा एजन्सीजचे प्रमुख सचिनशेठ कसलीवाल यांनी अन्नदान केले. विचार पिठावर संयोजक गणेश तादलापूरकर,अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,कार्याध्यक्ष शिवाजो नुरुंदे, सचिव ईश्वर अण्णा जाधव, उपाध्यक्ष भारत डी.सरोदे,सतीश कावडे,प्रा.माधव बसवंते,प्रा. इरवंत सूर्यकार, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, द्रौपदा कांबळे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय गायकवाड, सूर्यकांत तादलापूरकर,प्रवीण खोबरे, लालबाजी घाटे, भारत खडसे, निलेश तादलापूरकर,गजानन गायकवाड, रोहन वाघमारे, संजय गोटमुखे, सुरेश कांबळे, गणेश मोरे, राहुल तेलंग, आकाश गवाले, राहुल खण्डेलोटे, सुनिलकुमार मोघेकर, कॉ.दिगंबर घायाळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मानसी तादलापूरकर यांनी लक्षवेधी भाषण केले. रात्री उशिरापर्यंत उपनगारातील मिरवणूका येत होत्या आणि कॉ. अण्णा भाऊंना मानवदंना देत होत्या. अशी माहिती जिल्हा जयंती मंडळाचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button