करियरनांदेड

Degloor News : आधुनिक तंत्रज्ञानाचे न्यू एज कोर्सेस आता देगलूरमध्ये उपलब्ध

नांदेड| कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या न्यू एज कोर्सेस योजनेंतर्गत देगलूर येथील अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सोलार टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या नवीन अभ्यासक्रमाची सुरूवात झाली आहे.

या कोर्ससाठी एकूण दोन युनिट असून एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर कोर्स आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी देतो. विद्यार्थ्यांनी या कोर्ससाठी वेळेत नोंदणी करून प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य, अक्का महादेवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देगलूर, जि. नांदेड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button