नांदेडलाइफस्टाइल

out of danger : वाघाळा येथील आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर

नांदेड| जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रशासन पूर्ण लक्ष ठेवून असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे.

जिल्हयातील वाघाळा येथील माताजी शिक्षण संस्था संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील निवासी 8-10 विद्यार्थ्यांना आज सकाळी 9 वा. जेवण केल्यानंतर उलटी व मळमळ होत असल्याचे जाणवले.या विद्यार्थ्यांवर लगेच नांदेड येथील शासकीय वैद्यकिय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे.

आश्रमशाळेतील शिक्षकांनी सर्व 59 विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय विष्णपुरी नांदेड येथे दाखल केले आहे. या विद्यार्थ्यांची इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी भेट घेऊन प्रकृतीबाबत संबंधित डॉक्टरांची प्रत्यक्ष चर्चा केली. विद्यार्थ्यांची प्रकृती सुस्थितीत असून त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली दिली असल्याचे श्री. मिनगिरे यांनी स्पष्ट केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button