नांदेडराजकीय

Election Adjudication Officer Dr. Sachin Khalal ; निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ – NNL

नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 87 नांदेड दक्षिणचे प्रशिक्षण 26 व 27 ऑक्टोबर 2024 रोजी नागार्जुना पब्लिक स्कुलकौठा,नांदेड येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्षप्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी  असे एकूण 2 हजार 684 जणांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित होते. परंतु यापैकी मतदान केंद्राध्यक्ष 49, प्रथम मतदान अधिकारी 48 आणि इतर मतदान अधिकारी 104 असे एकूण 201 कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित होते.

या सर्वांना कारणे दाखवा नोटीस देवून खुलासा सादर करण्यास चोवीस तासांचा अवधी दिला होता. आजपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष 24, प्रथम मतदान अधिकारी 32 आणि इतर मतदान अधिकारी 63 असे एकूण 119 जणांनी खुलासा सादर केला आहे. अजून  82 जणांनी खुलासा सादर केला नाही. अशा 82 जणांवर तात्काळ गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नांदेड दक्षिणचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  डॉ.  सचिन खल्लाळ यांनी दिले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!