क्राईमनांदेड

All Out Operation in Nanded Zone : नांदेड परिक्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन मधून कार्यवाही -NNL

नांदेड|आगामी सण आणि उत्सवांचे तसेच विधानसभा निवडणुक-2024 चे पार्श्वभूमीवर, नांदेड परिक्षेत्रातील हॉटेल्स व धाब्यांवर विनापरवाना देशी- विदेशी दारूची होणारी विक्री तसेच पान टपऱ्या व किराणा मालांच्या दुकानातून गुटख्याची होणारी विक्री याविरुध्द दि.27/10/2024 रोजी ऑल आउट ऑपरेशन  आयोजन केले होते.

सदर कारवाई दरम्यान परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांत एकाच वेळी हॉटेल, धाबे, पान टपऱ्या व किराणा दुकाणे इत्यादी  तपासण्यात आले. यादरम्यान पोलीसांनी केलेल्या जिल्हानिहाय कामगिरीचा आढावा खालीलप्रमाणे

.क्र. जिल्हा एकुण किती हॉटेल/धाबे चेक केले करण्यात आलेली कारवाई
देशी/विदेशी दारु गुटखा
जप्त मुद्येमाल किंमत जप्त मुद्येमाल किंमत
1 नांदेड 579 देशी/विदेशी/

गावठी

23,300 सुगंधित पान मसाला व गुटखा 3580
2 परभणी 109 देशी/विदेशी 31,512
3 हिंगोली 99 देशी/विदेशी 68,630 सुगंधित पान मसाला व गुटखा 24,515
4 लातूर 252 देशी/विदेशी/

गावठी

43,995 सुगंधित पान मसाला व गुटखा 3230
एकुण परिक्षेत्र 1039 देशी/विदेशी/

गावठी

1,67,437 सुगंधित पान मसाला व गुटखा 31,325

सदर कारवाईत, नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, परभणीचे पोलीस अधीक्षक  श्री. रवींद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे व लातूरचे पोलीस अधीक्षक  श्री. सोमय मुंडे यांचेसह संबंधित जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक, सर्व पोलीस उप अधीक्षक, संबंधित पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक/सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, अंमलदार , स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचा समावेश होता. चारही जिल्हयांनी परिक्षेत्रातील एकूण (1039) हॉटेल व धाबे तपासून एकुण  1,67,437/- रुपयांची दारु व  31,325 रुपयांचा गुटखा असा एकूण 1,98,762/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आपल्या भागातील हॉटेल्स व धाब्यांवर विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री तसेच पानटपऱ्या किंवा किराणा मालाच्या दुकानात होणारी गुटख्यांची विक्री यांचेसह अशा मालांच्या पुरवठादारांची माहिती नागरिकांनी, पोलिसांना देऊन, सदर मोहिमेस हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!