Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

हदगाव| हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक येथील प्रतिष्ठित नागरिक शेख मुसा शेख चांद उर्फ मूसा सेठ यांचे आज दि.२० जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षी होते. त्यांच्या पार्थिव देहावर सुमारास हदगाव शहरातील कब्रस्तान येथे मुस्लिम रीतीरीवाज प्रमाणे अंत्यविधी करून अंत्यसंस्कार पार पडले.


हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक स्थित असलेले शेख मुसा सेठ हे शहरासह तालुक्यात परिचित होते कोणत्याही समाजाचे कोणतेही काम असो ते त्यांना योग्य सल्ला देत होते. किंवा अंमलबजावणी करण्यास भाग पाडत होते. तसेच अणखी विशेष म्हणजे निजामकालीन महसुल च्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक बाबतीत त्याचे बरेच योगदान असुन, त्याचे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळचा संबध होता. पण त्यानी कोणत्या ही राजकीय पक्षाचे कधी ही सदस्यत्व स्विकारले नाही म्हणून त्यांची शहरासह तालुक्यात परिचित होते. मृत्यू पश्चात त्यांच्या पत्नी, २ मुले, १ मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या अकाली जाण्याने शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.




