HomeनांदेडDr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात 300...

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परीसरात 300 झाडांचे वृक्षारोपण मियावाकी पद्धतीने -NNL

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड परिसरात जवळपास 300 झाडांचे वृक्षारोपन मियावाकी पध्दतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

अधिष्ठाता यांनी मियावाकी वृक्षलागवड ही पध्दत जपानमधील वनस्पती पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. अकीरा मियावाकी यांनी शोधून काढली असुन मियावाकी पध्दतीने वृक्षारोपन केल्यामुळे कमी जागेत जास्त झाडे लावता येतात ज्यामुळे सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी वृक्षांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांची वाढ जोमाने होते. या पद्धतीमुळे जैवविविधता जोपासण्यास हातभार लागुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते व आपल्या भावी पिढीचे जगणे सुखकर होईल असे मत व्यक्त केले. तसेच अधिष्ठाता यांनी वृक्षांचे संगोपन हा फार महत्त्वाचा भाग असल्याने अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत वड, कडूनिंब, पिंपळ, चिंच, आवळा, बांबू, जांब, हिरडा इत्यादी प्रकारचे वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास डॉ. वाय. एच. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, डॉ. एस. आर. मोरे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, डॉ. राजेश अंबुलगेकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, अस्थीव्यंगोपचारशास्त्र विभाग, डॉ. किशोर राठोड, प्राध्यापक व विभाग प्रमुख, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग, डॉ. सुधा करडखेडकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरिरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. वैशाली इनामदार, प्राध्यापक व विभाग प्रमुख, शरिररचनाशास्त्र विभाग,

डॉ. भावना भगत, प्राध्यापक व विभाग प्रमुख, दंतशास्त्र विभाग, डॉ. अनिल देगांवकर, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, डॉ. अतिष गुजराती, सहयोगी प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र विभाग, डॉ. मुकुंद कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र विभाग, डॉ. आय. एफ. इनामदार, सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग, डॉ. सलिम तांबे, सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग, डॉ. अभिजित देवगरे, उप वैद्यकीय अधीक्षक व संयज वाकडे, प्रशासकीय अधिकारी महाविद्यालय विभाग व के. बी. विश्वासराव, प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय विभाग, श्रीमती अलका जाधव, अधिसेविका यांचेसह विविध विभागाचे वैद्यकीय अध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी वृंद हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन हे डॉ. आर. डी. गाडेकर, सहयोगी प्राध्यापक, जन औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments