किनवट,परमेश्वर पेशवे। डोंगराच्या लगत असलेल्या शेतीमधील जिवंत गांजाची झाडे असलेल्या शेतीमध्ये पोलिसांनी धाड टाकून कारवाई करत तब्बल एक ते दोन ट्रॅक्टर गांजाची झाडे निघतील एवढे गाजाची झाडे जप्त करून कारवाई केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी दुर्गम बहुल भागातील डोंगरगाव व दिग्रस परिसरात नांदेड पोलीसांच्या पथकासह किनवट इस्लापूर पोलीसांनी केली.


किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डोंगरावर व दिग्रस परिसरातील शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती नांदेड विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांना गुप्त माहिती मिळाली.


या माहिती अधारे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर उपविभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय,यांच्या पथकासह किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला सहाय्यक दुय्यम पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस उपनिरीक्षक झाडे,येवले,
सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक आतूल डाके याच्यासह पो,हे,का,एस आर मुंडे लखूळे पुरी, दंगा नियंत्रण पथकाचे महिला व पुरूष असलेले जवळपास 42 पोलीस कर्मचाऱ्यांनी 01आक्टोबर 2024 रोजी सकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास कापसाच्या व तुरीच्या शेतीमध्ये धाड टाकली.



येथे एक ते दोन ट्रॅक्टर गांजाची झाडे निघतील अशी हजारो गांजाची झाडे दहा ते बारा मजुराच्या साह्याने शेतीतून बाहेर काढून जप्त करून कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होती. या कारवाई दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख दाऊद,व तलाठी वन विभागाचे वनपाल, वनरक्षक, कृषी विभागाचे,कृषी सहाय्यक यांच्यासह जवळपास शंभर कर्मचाऱ्यांचा ताफा होता. या कारवाई मुळे परिसरात एकच खळबळ उडाली.


