क्राईमनांदेड

Police arrest : 7 महीन्या पासुन खुनाच्या गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीस स्थागुशाने केली अटक

नांदेड| पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील खुनाच्या गुन्हयातील 7 महीन्या पासुन फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या पथकाने जेरबंद केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी धिरज प्रकाश सोनकांबळे रा. अरुणोदय नगर व त्याचा मित्र दिपक पाईकराव असे दोघे पावडेवाडी नाक्याकडुन आंबेडकर नगर पाठीजवळ बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. येथे अनोळखी दोन ते चार ईसमांनी तुम्ही कुठे जात आहात अशी विचारणा करुन विनाकारण लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीस गंभीर दुखापत करुन फिर्यादीचा मित्र दिपक पाईकराव यास दोन ते चार ईसमांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडाने डोक्यावर मारहाण करून गटारात टाकुन दिले. त्यानंतर कोणीतरी पोलीसांना कळवल्यानंतर पोलीसांनी फिर्यादी व मयतास सरकारी दवाखाना येथे दाखल केले. परतु उपचार घेत असताना फिर्यादीचा मित्र दिपक पाईकराव यांचा मृत्यु झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्था.गु.शा येथील पो.उप.नि. साईनाथ पुयड हे पथकास नांदेड व परभणी येथे आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलिंग करीत लिंबगाव येथे आले होते. यावेळी आंबेडकर नगर येथील दिपक पाईकराव यांचा खुन केलेला आरोपी हा नांदेड पुर्णा रोड वरील नाळेश्वर कडील जाणारे रोडवर थांबलेला असल्याचे समजल्याने पोलीस टीमने सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता तिथे एक सशंयित आरोपी मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव निकेत ऊर्फ NDK श्याम घिरे वय 23 वर्ष रा. आंबेडकर नगर नांदेड असे सांगुन त्याने सात महीन्यापुर्वी खुन केल्याची कबुली दिली.

त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील अभिलेखाची पाहणी केली असता पोस्टे शिवाजीनगर येथे वर प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पण झाले. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले असुन, पुढील तपास पोलीस अधिकारी यु. के. कदम हे करीत आहेत. या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button