Police arrest : 7 महीन्या पासुन खुनाच्या गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीस स्थागुशाने केली अटक
नांदेड| पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील खुनाच्या गुन्हयातील 7 महीन्या पासुन फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा नांदेडच्या पथकाने जेरबंद केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी धिरज प्रकाश सोनकांबळे रा. अरुणोदय नगर व त्याचा मित्र दिपक पाईकराव असे दोघे पावडेवाडी नाक्याकडुन आंबेडकर नगर पाठीजवळ बिर्याणी खाण्यासाठी गेले होते. येथे अनोळखी दोन ते चार ईसमांनी तुम्ही कुठे जात आहात अशी विचारणा करुन विनाकारण लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीस गंभीर दुखापत करुन फिर्यादीचा मित्र दिपक पाईकराव यास दोन ते चार ईसमांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडाने डोक्यावर मारहाण करून गटारात टाकुन दिले. त्यानंतर कोणीतरी पोलीसांना कळवल्यानंतर पोलीसांनी फिर्यादी व मयतास सरकारी दवाखाना येथे दाखल केले. परतु उपचार घेत असताना फिर्यादीचा मित्र दिपक पाईकराव यांचा मृत्यु झाल्याम...
