नांदेड| वजिराबाद पोलीसांना राखी पौर्णीमेच्या दिवशी दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी 13.25 वाजताचे सुमारास चक्रधर दत्तात्रय खानसोळ, वय 30 वर्षे, रा कामळज ता मुदखेड जि नांदेड यांचे कडुन माहिती मिळाली की, डॉक्टर लाईन परिसरातील डॉक्टर उमरेकर हॉस्पीटल समोर रोडवर एक अनोळखी मनोरुग्ण महिला वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाची जोर जोरात ओरडुन धिंगाणा करीत आहे. तिच्या सोबत असलेले 6 ते 7 महिन्याचे बाळाला मारहाण करत आहे. तिचे नाव गाव विचारले असता ती काही सांगत नाही अशी खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षकपरमेश्वर कदम यांचे आदेशाने बिट जमदार पोहेकों शरद सोनटक्के यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवुन भेट दिली.


यावेळी महिलेस विचारपुस केली असता ती काही एक सांगत नसुन वेडे पणात जोर जोरात ओरडत होती. तिच्या सोबत लहान बाळ असल्याने चॅईल्ड हेल्प लाईनला संपर्क साधुन महिला अधिकारी यांची मदत घेवुन लहान बाळास व वेडसर महिलेस ताब्यात घेतले. त्या दोघांची वैद्यकीय तपासणी करुन बाळास बाल कल्यान समिती समोर हजर करुन त्यांचे आदेशाने बाळास सावीत्री बाई फुले शिशु गृह ता. लोहा येथे दाखल केले.


आणि मनोरुग्न महीलेस न्यायालयात हजर करुन मा. न्यायालयाचे आदेशाने महिलेस सरकारी दवाखाना विष्णुपुरी, नांदेड मनोरुग्ण वार्ड क्र. 35 मध्ये मनोरुग्ण उपचार कामी शेरीक केले. सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड यांनी सदर महिलेवर औषधोपचार करुन सदर महिलेस पुढील उपचार कामी प्रादेशीक मनोरुग्णालय येरवाडा पुणे येथे दाखल करण्याचा अभिप्राय दिल्याने सदर महिलेस दिनांक 10/09/2024 रोजी मा. न्यायालयाचे समक्ष हजर करुन मा. न्यायालयाचे आदेशाने सदर महिलेस खाजगी वाहणाने प्रादेशीक मनोरुग्णालय येरवाडा पुणे येथे उपचार कामी दाखल केले.


सदर महीलेस रुग्णालयात दाखल केल्यानंतर एकुण 11 महिने तिचेवर उपचार चालु होता दरम्याण सदर महिलेच्या नातेवाईकाचा शोध होणे कामी पोलीस स्टेशन वजिराबाद येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले असता महीलेचे नाव मंटादेवी बिरबल महंतो रा. चंपारण बिहार येथील असल्याचे समजले त्यानंतर वजीराबाद पोलीसांनी प्रादेशीक मनोरुग्णालयाचे संपर्कातील एन. जी. ओ. यांना संपर्क करुन त्यांचे मार्फतीने सदर महिलेच्या नातेवाईकाचा सतत शोध घेतला.

तिचे नातेवाईक हे बिहार राज्यातील चंपारन जिल्हयातील मलाईटोला या गावात असल्याचे समजल्याने त्यांचेशी संपर्क करुन सदर महिले बाबत विचारपुस करुन व खातरजमा करुन सदर महिलेची त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सदर महिलेचा पती बिरबल महंतो बाबत माहीती मिळाली त्यास संपर्क केला असता तो रुग्णालयात आल्याने व महिलेची प्रकृती सुधारल्याने सदर महिलेस पती सह नांदेड येथ घेवुन येवुन त्यांना त्यांची 6 महिन्याची मुलगी बालकल्यान समितीच्या आदेशाने लोहा येथील सावीत्रीबाई फुले शिशुगृह येथुन घेवुन तिचे व तिचे पतिचे ताब्यात सुखरुपरित्या देण्यात आले.
त्यानंतर सदर महिलेने तिचे सोबत त्या दिवशी तिची दुसरी मुलगी होती असे सांगीतल्याने, वजिराबाद पोलीसांनी त्याबाबत माहिती घेतली असता, पोलीस स्टेशन वजिराबाद येथील पोलीस जमादार पोहेका/654 कांबळे यांना दिनांक 19/08/2024 रोजी रेल्वेस्टेशन परीसरात एक तिन वर्षाची मुलगी मिळाल्याने त्यांनी सदर मुलीस बालकल्याण समिती यांचे आदेशाने नरसाबाई महिला मंडळ वडगाव संचलित शिशुगृह, गितानगर नांदेड या शिशुगृहात दाखल करण्यात आले होते, सदर मुलगी हि त्या वेडसर महिलेचीच असल्याची खात्री झाल्याने सदर मुलीस बालकल्याण समितीच्या आदेशाने त्यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची महिली तिचा पती व दोन मुली हया नांदेड येथुन बिहार साठी दिनांक 10/07/2025 रोजी दुपारी दोन वाजता रेल्वेने रवाना झाले आहेत.
वजिराबाद पोलीसांनी श्रध्दा (NGO) यांचे सहकार्याने मनोरुग्ण महिलेचा औषधोपचार करुन तिस येरवाडा मनोरुग्णालय येथे दाखल करुन तिचे 6 ते 7 महीण्याचे बाळ यास शिशुग्रहात दाखल केले तसेच सदर मनोरुग्ण महीलेस तिची दुसरी मुलगी व नातेवाईक मिळवुन दिली. दोन्ही लहान बाळांना त्यांचे आई वडील मिळवुन देवुन माणुसकीचे दर्शन घडवुन उत्कृष्ट कामगीरी करुन नांदेड जिल्हा पोलीस दलाचे नावलौकीक वाढवले असल्याने अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले व अभिनंदन केले आहे.


