कृषीनांदेड

District Collector Rahul Kardile visits : प्रगतशील शेतकरी गजानन तुपतेवार यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लांटला जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज हिमायतनगर येथील प्रगतशील शेतकरी गजानन तुपतेवार यांच्या ड्रॅगन फ्रुट प्लांटला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याने हा उपक्रम राबवून घेत असंलेल्या फळाच्या उत्पदनाबाबत अभिनंदन केले. तसेच इतर शेतकऱ्यांनी तुप्तेवार यांचा आदर्श घेऊन उतपादन घ्यावे असे आवाहन त्यांनी केलं.

हिमायतनगर येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार यांनी मागील जागी वर्षांपासून हिमायतनगर – बोरी रोडवर असलेल्या आपल्या शेतात ड्रॅगन फुट प्लांटेशन केले होते. या फळाच्या माध्यमातून त्यांनी चांगले उत्पादन मिळविले असून, राजलक्ष्मी ड्रॅगन फुट फॉर्म नावाने हे फळ बाजारात पाठविले जात आहे.

हिमायतनगर येथील एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर ड्रॅगन फुट फळाचे उत्पादन घेणारे प्रगतिशील शेतकरी गजानन तुप्तेवार यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मंगळवारी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी यांचा स्वागत सत्कार तुप्तेवार परिवाराच्या वतीने करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या सोबत तहसीलदार पल्लवी टेमकर, तलाठी पुरी व इतर कर्मचारी तसेच बाळू अण्णा चवरे, धनंजय तुपतेवार शे. मोईन आदी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button