हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील मौ, सरसम बु या गांवच्या विकासाकडे शासन, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खरे गरजू शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. वारंवार मागण्या करूनही जाणीवपुर्वक वंचित ठेवले जात असल्याने त्रस्त झालेल्या अपंग पुरुष महिलांनी थेट गटविकास अधिकारी यांचे कार्यालय गाठून ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराची पोलखोल करत विविध मागण्याचे निवेदन दिले आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर दिनांक २६ जानेवारी रोजी सरसम बु ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष सौ.सीमाताई गोखले यांनी दिला आहे.
मौजे सरसम ता. हिमायतनगर जि. नांदेड येथिल रहिवाशी असलेल्या महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सरसम गांव विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडून गांवचा कोणताही विकास केला जात नाही. येथिल ग्रामविकास अधिकारी कौडामंगल महिन्यातून एक ते दोन वेळा गांवात हजर राहून मर्जितल्या लोकांचे कामे करतो. वेळेवर ग्रामसभा घेवून जनलेला कुठल्याही विकास कामाची माहिती परिदर्शक पणे सांगत नाही. या गावात रुजु झाला तसे गांवचा विकास खुंटला आहे, गांवातील रस्ते, नाल्या व पाणी पुरवठ्याची कामे बरोबर कागदावरच करित आहे. कुठल्याही शासनाच्या योजना या ठीकाणी ग्रामसभा घेवून जनतेला कळवत नाही.
ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य यांचा पण त्याच्यावर कुठलाही वचक नाही. ग्रामपंचातीच्या सत्तेत असलेले राजकीय सदस्य मुग गिळून गप्प बसल्यासारखे वागत असल्याने सामन्य जनता त्रस्त झाली आहे. तसेच गांवात अवैध धंदे वाढल्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. एखाद्याने माहितीचा अधिकार अर्ज केला कि लागेचच वेगवेगळ्या बोगस पावत्या जोडून ग्रामविकास अधिकारी बिले काढून देउन आपला हिस्सा घेऊन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. तसेच दिव्यांग यांचा विषय दरवेळेस आराखड्यात घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यांच्या नाकर्तेपणा झाकण्यासाठी तो दिव्यांगांना भरपुर त्रास देतो. गावातील नागरिकांना नागरी सुविधा देण्याचे सोडून घरपट्टी, नळपट्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात तो वसुली करतो. एखादा दिव्यांग बिला संदर्भात विचारला तर टाळाटाळ करून खोटे आश्वासन देतो आहे.
जि.प. शाळांना बांधकामाचे बजेट आले, दलित वस्तीचे बजेट, सभागृहाचे रिपेरिंगचे बजेट आले असता त्या निधीचा गावक-यांना थांगपत्ता लागू देत नाही आणि संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शासनाच्या निधीची वाट लावतो आहे. कोणत्याही महामानवांच्या जंयतीला हजर राहून तो जंयती सादर करित नाही. या प्रकारामुळे गांवातील जनता अडमुळे धोरणाला कंटाळली आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या गावाच्या विकास कामाकडे लक्ष द्यावे. आणि ग्रामविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करावी. गांवची ग्रामपंचायत जर गांवचा विकास करित नसेल तर 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 11.00 वा. सरसम ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप लावण्यात येईल. असा इशारा निवेदनातून विविध योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या अपंग, महिला, पुरुष मंडळींनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कार्यालय नादेड, जिल्हाधिकारी साहेब (जि.का.) नांदेड, तहसिलदार हिमायतनगर, पोलीस निरिक्षक हिमायतनगर, ग्रामपंचायत कार्यालय सरसम याना दिले आहे. या निवेदनावर शामराव ग्यानोबा खिराडे, लक्ष्मीबाई माधव कवडे, चांगुनाबाई पुंजाराम कांबळे, लक्ष्मीबाई दिगांबर गोखले, लक्ष्मीबाई भाऊराव कवडे, दत्ता नामदेव कांबडे, सुधाबाई दत्ता कांबळे, ललीता प्रकाश थोरात, माधव कोंडबा कवडे, कुसुमबाई जळबा कांबळे, रुख्मिनाबाई विठ्ठल गुंडेकर, वंदनाबाई आशोक विनायते, रंगुबाई कचरू कांबळे, यशवंता लक्ष्मण चव्हाण, सौमित्राबाई नागोराव कांबळे, सिमाताई गंगाधर गोखले, सरस्वतिबाई तुकाराम गोखले, मनीषा संभाजी कदम आदींसह अपंग पुरुष व महिला से मिळवून २०० पेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या निवेदनासोबत जोडल्या आहेत.
निवेदन देण्यासाठी आम्हीसर्व पंचायत समिती कार्यालयात आले असता बीडीओ साहेबानी देखील आम्हाला उडवा उडवीची उत्तरे देत ग्रामसेवकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रश्न तुमच्या ग्रामपंचायतच्या लेव्हलचा आहे, येथे यायची आवश्यकता नवहती अश्या भाषेचा उपयोग करून आमच्या प्रश्न मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत ग्रामसेवक जर काम करत नसेल तर बीडीओ यांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करून गावातील समस्या तिथेच मिटविल्या गेल्या पाहिजेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र उलट तक्रारदार महिलांना इथे कश्याला आला असे म्हणून एक प्रकारे कर्तव्यात कसूर करण्याचा प्रकार अवलंबविला असल्याचा आरोप सौ.सीमाताई गखले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.