elections announced : संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

नांदेड| संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख कॉम्पलेक्स नवीन मोंढा नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 14 मे 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 9 संचालक निवडुन द्यावयाचे असुन त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 6, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून 1 आणि महिला राखीव मतदारसंघातून 2 संचालकाची निवड करावयाची आहे.

सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 9 जून 2025 रोजी संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. 10 ते 15 जून 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 16 ते 19 जून 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. 19 जून 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे.

20 ते 24 जून 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 24 जून 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 1 जुलै 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिद्धी 1 जुलै 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. दिनांक 7 जुलै 2025 रोजी दु. 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी 7 जुलै 2025 रोजी दु. 5 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 13 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 13 जुलै 2025 रोजी मतदान संपल्यानंतर लगेच करण्यात येणार आहे. को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 16 जुलै 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे.

संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख, कॉम्पलेक्स् नविन मोंढा नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन संगम अर्बन मल्टीस्टेट को- ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., देशमुख कॉम्पलेक्स् नविन मोंढा नांदेडचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अधिक माहिती संस्थेचे देशमुख, कॉम्पलेक्स, नविन मोंढा, नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळतील, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button