हिमायतनगर,अनिल मादसवार| प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात रक्तदान, भव्य शोभायात्रा आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा समावेश करण्यात आला आहे.


हिमायतनगर (वाढोणा) शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती हिमायतनगर तर्फे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून भव्य रक्तदान शिबिरास सकाळी सुरुवात करण्यात येणार आहे. शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर असलेल्या मैदानात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीस्त जास्त संख्येने उपस्थित होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.


दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्याने सायंकाळी 4 ते 10 या वेळात काढण्यात येईल. या शोभा यात्रेत सर्वानी सामील होऊन शोभा वाढवावी. तसेच दिनांक 4 मार्च 2025 ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे हरी कीर्तन सायंकाळी 5 ते 9 वाजेच्या दरम्यान हिमायतनगर शहरातील बस स्टँड परिसरात होणार आहे. या विविध कार्यक्रम सोहळ्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शोभा वाढवावी असे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती हिमायतनगर यांच्या वतीने करण्यात आलं आहे.




