नांदेडकरियर

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नविन अर्ज करण्यासाठी 16 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ -NNL

नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. शासन परिपत्रकानुसार स्वाधार साठी पात्र विध्यार्थ्यास अर्ज कण्यासाठी 16 डिसेंबरपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी खालील निकषा प्रमाणे अर्ज करावेत असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष/सूचना विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी (केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असलेल्या) विध्यार्थ्यानी अर्ज करणे आवश्यक आहे परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विद्यार्थ्यास इयत्ता १०वी/११ वी,१२वी/पदवी/ पदविकामध्ये किमान ५० टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४० टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावा.

विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा ०२ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. तसेच या प्रणालीमध्ये आपले महाविद्यालय महानगर पालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी. च्या आत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज वसतिगृह स्तरावरून रिजेक्ट झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना इडीटचे ऑपशन येणार आहेत. हे ऑपशन आल्यानंतर अर्ज इडिट करून अर्ज स्वाधार साठी शासन निर्णयातील निकषानुसार सर्व कागदपत्र जोडून पुश्च एकदा महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे सादर करावेत.

विद्यार्थ्यांचे या योजनेच्या लाभाची रक्कम ही आधार संलग्न बँक खात्यात पडणार असल्याने सर्व विध्यार्थ्यानी आधार लिंक करून केवायसी करून घ्यावी व अर्ज भरत असताना आधार क्रमांक अचूक आहे याची खात्री करावी. ज्या विद्यार्थ्यांचा नूतनीकरणाचा अर्ज आहे त्यांनी EXISTING या टॅबवरून अर्ज भरावा (वसतीगृहास करू नये ) तसेच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी थेट स्वाधारला अर्ज करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यानी यापूर्वी ऑनलाईन प्रणाली मार्फत वस्तीगृहासाठी अर्ज केला आहे. त्यांचे अर्ज स्वाधार साठी आपोआप वर्ग होतील त्यांना वेगळ्याने स्वाधार साठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तेंव्हा पात्र विद्यार्थ्यानी http://hmos.mahait.org या संकेतस्थळावर निकषानुसार १६.१२.२०२४ या कालवधीत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची १ प्रिंट आवश्यक त्या कागदपत्रा सह प्रवेशित महाविद्यालयातील समान संधी केंद्राकडे जमा करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांनी खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही असेही समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button