HomeकृषीDistrict Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज...

District Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL

नांदेड| जमिनीतील रासायनिक खतांचा होणारा अतिवापर टाळून जमिनीमध्ये जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच 5 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत तर प्रमुख मार्गदशक म्हणून तालुका कृषी अधिकारी चातरमल, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती.

जैविक संघ ट्रायकोडर्मा, मेटज्ञराझियम, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आदी सूक्ष्म जीव व जैविक घटकांचा वापर करावा असे सांगितले. जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी एकात्मीक अन्न द्रव्य व्यवस्थापन, मिश्र पीक पद्धती विषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी जमिनीशी असलेली आपली नाळ घट्ट करावी असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी सांगितले.

डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना आपल्या प्रमुख मार्गदर्शनातुन मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करुन शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करावा. मृदेचे आरोग्य व जैवविविधता जोपासावे असे सांगितले. कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ प्रा. संदीप जायभाये यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खतांच्या मात्रा द्याव्यात तसेच मृदेचा सामु, सेंद्रिय कर्ब यांची माहिती सोप्या भाषेत सांगितली. तसेच मृदा चाचणीतुन शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. पवळे मॅडम यांनी मृदेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मृद परीक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले व त्याचे महत्त्व सांगितले.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कळसाईत यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच कृषि विज्ञान केंद्र येथील प्रशिक्षित घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रमाणपत्र सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. महेश अंभोरे यांनी केले तर जि.मृ.स.मृ चा अधिकारी पी. पी. पल्लेवाड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड कार्यालयातील कृषी पर्यवेक्षीका जे.सी. शिंदे, कृषि सहाय्यक एस.एस. सोनवणे, गुप्ता मॅडम, दत्तत्रय चिंतावार, गजानन पडलवार, राहुल जाधव, जावेद शेख, मोहन बेरजे, सुनील कराळे, एम.ए. पठाण आदींनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments