नांदेड| आज सकाळी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावरून, अवयवदान जाणीव जागृतीचे भव्य आयोजन करण्यात आले .सकाळीच महात्मा फुले पुतळ्याजवळ सर्व प्रथम अवयवदान प्रतिज्ञा ज्योती पिपंळे यानी दिली.


त्यानंतर अर्पण अवयवदान समितीचे अध्यक्ष माधव अटकोरे यानी मनोगत व्यक्त करताना 3 ते 15 ऑगस्ट या पधंरवाड्यात मोठ्या प्रमाणावर अवयवदान विषयावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, हा पधंरवाडा लाकुड मुक्त स्मशानभूमी अभियान राबविण्यात येणार आहे .प्रत्येकाने अवयवदान संकल्प करून या माणुसकीच्या विचाराला गतीमान करावे आणि अवयवदानाच्या बाबतीत नांदेड जिल्हा स्वयंपूर्ण करावा असे आवाहन केले.


त्यानंतर या अभूतपूर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके,जि.प.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, डॉ. यशवंत पाटील, डॉ. हनमत पाटील, डॉ. सत्यनारायण मुरमुरे आणि माधव अटकोरे यानी रॅलीच्या सुरूवातीला हिरवा झेन्डा दाखवून रॅलीची सुरूवात केली . या रॅलीत शासकीय वैद्यकीय रूग्णालयात, आयुर्वेदिक महाविद्यालयात, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी,परिचारिका,डॉक्टर, जेष्ठ पत्रकार आणि पत्रकार ईन्नव्हील क्बचे पदाधिकारी आदीउपस्थित होते .




