क्राईमनांदेड

Nanded Crime : नांदेड शहरातील गुन्हेगारीचा वाढता चेहरा ; पार्किंगमध्ये उभी असलेली क्रेटा कार अज्ञात इसमाने फोडली

Crime on the rise in Nanded city नांदेड| शहरातील जुना मोढा परिसरात उभी असलेली क्रेटा कारचे अज्ञात इसमाने काच फोडून 5 ते 7 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गाडीच्या मालकाने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार खैरा हंसराजसिंघ रसालसिंघ (वय 30 वर्षे) हे खासगी नोकरी करत असून, ते गुरुद्वारा गेट नं. 05, बडपूरा, नांदेड येथे राहतात. त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री 10:00 वाजता त्यांनी आपले वाहन MH 26 BX 2221 (क्रेटा कार) हे जुना मोढा येथील महाराजा रणजीतसिंघ मार्केटच्या पार्किंगमध्ये उभे केले होते.

मात्र 27 जून 2025 रोजी संध्याकाळी 8:00 वाजता, त्यांचा लहान भाऊ तरणजीतसिंघ रसालसिंघ खैरा याने पाहिले असता गाडीच्या काचा फोडलेल्या अवस्थेत आढळल्या. तसेच, गाडीतील वस्तूंना हात लावून 5 ते 7 हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही निदर्शनास आले.

या घटनेबाबत तक्रारदाराने पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या जबाबात दिलेली आहे. इतवारा पोलीस स्टेशनने घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button