करियरनांदेड

On behalf of Zilla Parishad Nanded : जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बंगळूर अभ्यासदौरा यशस्वीरीत्या संपन्न

नांदेड| जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शासनाच्या ‘अविष्कार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी 17 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बंगळूर येथे अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला. या शैक्षणिक सहलीत 38 मुली आणि 30 मुले असे एकूण 68 विद्यार्थी सहभागी झाले होते.

जिल्हा परिषदेच्या कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रेरणेतून व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासदौरा यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांनी या सहलीदरम्यान विश्वेश्वरय्या औद्योगिक व प्राद्योगिक संग्रहालय येथे सायंटिफिक मॉडेल्सचा अभ्यास केला तसेच HAL एरोनॉटिक्स आणि स्पेस म्युझियम मध्ये विविध वैमानिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. जवाहरलाल नेहरू प्लॅनेटेरियम येथे सूर्यमाला, चंद्रयान मोहिमा आणि गुरुत्वाकर्षण शक्तीविषयी सखोल माहिती घेतली. लालबाग बोटॅनिकल गार्डन येथे विविध प्रकारच्या वनस्पतींचा अभ्यास तर इस्कॉन टेम्पल येथील भव्य मंदिर रचनेचा अभ्यास करण्यात आला.

या सहलीचे नेतृत्व शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीना मांदळे व सहशिक्षक उदय हंबर्डे यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांची जबाबदारी केअरटेकर म्हणून सीमा देवरे, सुवर्णा बामनपल्ले, अमृता खंगार, सुधाकर मुखेडी, प्रवीण सूर्यवंशी, आकाश रेड्डी व निशांत पळणाटे यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक सहल अत्यंत माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरली असून, त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान तसेच निसर्गविज्ञानाचा अनुभव घेतला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!