उस्माननगर l परभणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व संविधानाची प्रतिमा उचलून रोडवर फेकून अवमान केल्याप्रकरणी याकृतीचा उस्माननगर येथील नागवंश मित्र मंडळ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायी यांनी नुकतेच उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि सि पवार यांना निवेदन देवून संबंधित आरोपींविरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.
परभणी शहरात १० डिसेंबर रोजी सकाळी ५ वा. च्या दरम्याण जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्टॅण्ड रोड वरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी असलेल्या भारतीय संविधानाच्या संदेशक प्रतिकृतीची एका समाज कंटकाने विटंबना केली . सदरील घटनेचा उस्माननगर येथील नागवंश मित्र मंडळ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला.
भारतीय घटनेच्या संविधानाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाच्या सुरूवातीस अशा पध्दतीने विकृत व अवमानकारक कृत्य होत असेल तर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खऱ्या स्वातंत्र्यात आहोत काय ? हा खरा प्रश्न उभा राहतो . सदर घडलेल्या घटनेची मुळ पार्श्वभूमी तपासून सक्षम यंत्रणे कडून चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून तसेच देशद्रोही व्यक्तीच्या पाठीशी कोणती जातीवादी व देशद्रोही शक्ती आहे.
याची चौकशी करून त्या सर्वांना कठोर शासन करण्यात यावे. या मागणीसाठी दि १२ /१२ डिसेंबर रोजी उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि सि पवार यांना नागवंश मित्र मंडळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी स्वप्नील गंगाधर कांबळे , अंगुलिमाल कुमार गोविंदराव सोनसळे , राहुल किशन सोनसळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.