HomeनांदेडNanded ; १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर २०० पीडितांचे आमरण उपोषण...

Nanded ; १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर २०० पीडितांचे आमरण उपोषण – कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

नांदेड l हिमायतनगर ग्रामपंचायत असताना ७० वर्षांपूर्वी तेथील अनेक नागरिकांना घरभाडे तत्वावर राहण्यासाठी जमीन देण्यात आली आहे. आताची नगर पंचायत घरभाडे, नळपट्टी आणि इतर कर नित्यनियमाने वसूल करीत आहे. राहतो ते घर नावावर व्हावे म्हणून झगडत असलेल्या नागरिकाच्या मागणीकडे हिमायतनगर नगरपंचायत मागील सात दशकापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

सर्वांना विद्युत मीटर देखील मिळाले आहेत.७० वर्षाचा कालखंड खुप मोठा असून एवढ्या कालखंडात भारताची फाळणी होऊन दुसरे देश तयार झाले आहेत. भारतात अनेक नवीन राज्य निर्माण होऊन शासनाचा अब्जाबधी निधी मिळवून घेण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु हिमायतनगर वाशीय मागील सात दशकापासून राहतो ते घर नावावर व्हावे म्हणून झगडत आहे.

ही स्वतंत्र भारतातील शोकांतिकाच म्हणावी लागेल. एकीकडे शासकीय जमीन आणि मोकळे भूकंड लाटण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु असून हिमायतनगर येथील पीडित मात्र घर नावावर व्हावे अर्थातच नमुना नंबर ४३प्रमाणे मालकी हक्क प्रमाणपत्र मिळावे म्हणून संघर्षशील लढा देतांना दिसत आहे.

यापूर्वी तहसील आणि नगर पंचायत वर अनेक लक्षवेधी आंदोलने करण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक आश्वासने देऊन वेळ मारून नेली आहे. मागील काही वर्षांपासून सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि लोकविकास संघर्ष समितीच्या संयुक्त नेतृत्वाखाली शासनाच्या विविध कार्यालयावर उपोषणे मोर्चे काढून सनदशीर मार्गाने लढा देने सुरु आहे.

रास्त मागण्या असूनही सरकार आणि शासनाच्या वतीने दखल घेण्यात येत नसल्याने निर्वांनीचा इशारा म्हणून १७ डिसेंबर रोज मंगळवार पासून किमान २०० पीडितांचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या भव्य आमरण उपोषणाचे नेतृत्व कॉ.दिगंबर काळे,जयश्री बीजेवार, गणेश रचेवार, नवीन कुमार मादसवार, गंगाधर गायके, परमेश्वर सूर्यवंशी, कांताबाई बनसोडे आदिजन करणार आहेत.

हे आंदोलन लोकविकास संघर्ष समितीचे मुख्य प्रवर्तक कॉ.विजय गाभने, सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होणार असून वरिष्ठानी तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने मागण्या सोडवाव्यात असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments