Wednesday, May 13

Tag: On behalf of Zilla Parishad Nanded

On behalf of Zilla Parishad Nanded : जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बंगळूर अभ्यासदौरा यशस्वीरीत्या संपन्न

On behalf of Zilla Parishad Nanded : जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बंगळूर अभ्यासदौरा यशस्वीरीत्या संपन्न

करियर, नांदेड
नांदेड| जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने शासनाच्या ‘अविष्कार’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी 17 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत बंगळूर येथे अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला. या शैक्षणिक सहलीत 38 मुली आणि 30 मुले असे एकूण 68 विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या प्रेरणेतून व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासदौरा यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांनी या सहलीदरम्यान विश्वेश्वरय्या औद्योगिक व प्राद्योगिक संग्रहालय येथे सायंटिफिक मॉडेल्सचा अभ्यास केला तसेच HAL एरोनॉटिक्स आणि स्पेस म्युझियम मध्ये विविध वैमानिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. जवाहरलाल नेहरू प्लॅनेटेरियम येथे सूर्यमाला, चंद्रयान मोहिमा आणि गुरुत्वाकर्षण शक्तीविषयी सखोल माहिती घेतली. लालबा...
error: Content is protected !!