नांदेडराजकीय

OBC leader Laxman Hake : हिमायतनगर शहरात 18 नोव्हेंबर रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जाहीर सभा होणार -NNL

हिमायतनगर| येणाऱ्या 18 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर शहरात भव्य रँली व श्री परमेश्वर मंदीर मैदानातील बसस्टँड येथे विजय संकल्प महासभा होणार आहे. या सभेला ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके व नवनाथ आबा वाघमारे यांचा मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे तमाम वंचित व ओबीसी समाज बांधवानी विजय संकल्प महासभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

हदगाव / हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील तमाम ओबीसी बहुजन बांधवांनी आलेल्या संधीचे सोने करून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा ओबीसी नेते दिलीप राठोड याना निवडून द्यावे. असे आवाहन प्रचाराच्या माध्यमातून मतदार संघात केले जात आहे. वंचित प्रचाराला गावागावातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विरोधकांकडून वंचितच्या उमेदवाराचा अपप्रचार करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचून ओबीसी व वंचित समाजाचे मतदान मिळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. या त्यांच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी वंचितच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ओबीसी समाज एकवटला आहे. याचे परिणामी आगामी निवडणुकीच्या मतदानातून दिसून येणार आहे.

दि.18 रोजी लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांचा उपस्थितीत हदगाव तालुक्यातून राहील सुरुवात होणार असून, मनाठा – बामनी फाटा – पळसा -मानवाडी फाटा – हदगाव – वाळकी फाटा – तामसा – आष्ठी – सोनारी फाटा – ते हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने निघालेली रैली परमेश्वर मंदीर बसस्टँड येथे आल्यानंतर रैलीचे रूपांतर भव्य सभेत होणार आहे. त्यामुळे हदगाव – हिमायतनगर विधानसभेतील प्रत्येक ओबीसी बहुजन समाज बांधवांनी सर्वे कामे बाजूला ठेवून ओबीसी बहुजन समाजाचा आमदार करण्याचा संकल्प करूण सभेला उपस्थित राहावे. असे आवाहन ओबीसी समाज संघटणा हिमायतनगर
तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!