Brahmotsava at Balaji Temple : सिडकोतील बालाजी मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विधीवत घटस्थपना – NNL

नवीन नांदेड। सिडको येथील श्री भगवान बालाजी संस्थान मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने ३ आक्टोबर रोजी घटस्थापना सायंकाळी करण्यात आली तर सकाळी विधीवत पुजन अभिषेक करण्यात आले.


नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको श्री भगवान बालाजी मंदिर संस्थान येथे ३४ वा ब्रम्होत्त्सव निमित्ताने ३ ते १२ आक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ३आक्टोबर रोजी आचार्य रंगनाथचार्य, मंदिर पुजारी व्दियांशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने विधीवत सकाळी महाअभिषेक व सायंकाळी सात वाजता घटस्थापना करण्यात आली.

ब्रम्होत्त्सव निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव जाधव, व्यंकटराव हाडोळे, बाबुराव बिरादार, तुकाराम नांदेडकर, आनंद बासटवार, डॉ.नरेश रायेवार,वैजनाथ मोरलवार,पुरूषोतम जवादवार,रामचंद्र कोटलवार,गोविंद सुंकेवार, पुंडलिक बिरादार व उत्सव समिती पदाधिकारी यांनी केले आहे.





