नवीन नांदेड| देश पातळीवर प्रतिष्ठित असलेली स्मार्ट इंडिया हॅकाथॉन स्पर्धा एआयसीटीई, नवी दिल्लीशिक्षण मंत्रालय इनोव्हेशन सेल, भारत सरकार दरवर्षी विविध सरकारी विभाग आणि खाजगी उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करते. स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हा एक प्रमुख देशव्यापी उपक्रम जो विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या काही अत्यंत महत्त्वाच्या आव्हानांचे निराकरण करण्यात गुंतवून ठेवण्यासाठी सुरु करण्यात आलेला आहे. हॅकाथॉनचे उद्दिष्ट शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुप्रयोग यांच्यातील अंतर कमी करणे हा आहे.
देश पातळीवर विविध नामांकित शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यामध्ये त्यांच्यातील सुप्त तांत्रिक गुणांना चालना देण्या साठी असलेली हि स्पर्धा या वर्षी के.आय. इ.टी. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन गाजियाबाद दिल्ली येथे दिनांक ११ ते १५ डिसेंबर २०२४ या काळात आयोजित करण्यात आली होती. या स्मार्ट इंडिया हॅकाथॉन – २०२४ च्या अंतिम फेरी मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड येथील रोबोटिक्स फॉर नेक्स्ट जनरेशन(आरएनएक्सजी) या रोबोटिक्स क्लब च्या विद्यार्थ्याच्या टीम विक्रमाने यशस्वी कामगिरीच्या बळावर रुपये एक लाखाचे (रु.१ लाखाचे) प्रथम पारितोषिक, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र मिळवून संस्थेच्या शिरपेचत मानाचा तुरा खोवला.
स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ही स्पर्धा संपूर्ण देशामधून आलेल्या स्पर्धकांमध्ये मानाची स्पर्धा असून यामध्ये विविध कॉलेज मधील स्पर्धक सहभाग घेत असतात. या स्पर्धेत संस्थेतून दोन टीमने अंतिम फेरीमध्ये स्थान मिळविले. त्यातील टीम विक्रमा या टीमने मिनिस्ट्री ऑफ पॉवरच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट साठी नाविन्य पूर्ण उपाय सुचवून (सोल्युशन देऊन) स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेले आहे. या विजेत्या संघामध्ये मार्गदर्शक प्रा.डॉ.मिलिंद भालेराव यांचे सह सार्थक खंदारे अंतिम वर्ष (इन्स्ट्रुमेंटेशन),साक्षी तेजराम ठाकरे – तृतीय वर्ष (मेकॅनिकल), शंतनू संतोषकुमार पांडे – तृतीय वर्ष (इलेक्ट्रॉनिक्स), निखिलेश दिपकराव देशमुख – तृतीय वर्ष (इलेक्ट्रिकल), अंशुदा श्रीकांत सराफ – तृतीय वर्ष (मेकॅनिकल), वरद प्रकाश वायळ – तृतीय वर्ष (इलेक्ट्रॉनिक्स), आणि सिद्धी संजय पोखरीकर – तृतीय वर्ष (इलेक्ट्रिकल) आदी विद्यार्थ्यांनी संस्थेतून सहभाग नोंदविला.
स्पर्धक विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक डॉ.मनेश ब.कोकरे यांच्या नेतृत्वामध्ये प्रा.डॉ.मिलिंद भालेराव व प्रा.डॉ.सिद्धांत गुढे यांचे मार्गदर्शन आणि प्रा.डॉ.जयश्री वाघमारे व श्री गजानन त्रिकुटकर यांचे सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी रायठ्ठ्ठा, संस्थेच्या नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉ. विनोद मोहितकर (संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई), राजश्रीताई पाटील,बाबा सुखविंदर सिंघजी,प्रशांत पौळ,निखील मुंडले, आशुतोष डुंबरे, डॉ.विक्रम गद्रे, डॉ. डी डी.डोये, डॉ.जे.व्हि.मेघा,संस्थेचे संचालक डॉ. मनेश ब.कोकरे, संस्थेतील विविध अधिष्ठाता,विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे कडून यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या धेय्य धोरणांविषयी तयार करण्यात आलेल्या पुस्तक स्वरूपातील “पॉलीसी डॉक्युमेंट” चे अनावरण सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.