उस्माननगर, माणिक भिसे। गेली ३९ वर्षे मी एक निष्ठेने शिवसेनेचे काम केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला वारंवार न्याय देण्याचे काम केले परंतु कै.बाळासाहेब ठाकरे व लोक नेते कै. गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यामुळे माझे राजकीय नुकसान झाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी आज पर्यंत एक निष्ठेने राहिलो.
बाळासाहेब हे बाळासाहेबच होते त्यांनी कधीच जातीपातीचा विचार न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले त्यातच एक मी एक होतो. सध्याचे राजकारण हे जातीपातीचे झाले असून मी शिवा संघटना काढल्याने माझी जात कळाली त्यामुळे प्रस्थापित लोकांकडून मला राजकारणात खूप त्रास झाला आज कै.गोपीनाथ मुंडे, कै.बाळासाहेब ठाकरे असते तर मी कॅबिनेट मंत्री राहिलो असतो या दोघांच्या निधनाने माझे राजकीय खूप मोठे नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख प्रा.मनोहर धोंडे यांनी कलंबर (बु) येथील शिवसंवाद मेळाव्यात बोलताना प्रतिक्रिया दिली.
लोहा तालुक्यातील मौजे कलंबर (बु) येथे रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी सेवा जनशक्ती पार्टी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सेवा जनशक्ती पार्टी ही महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे.त्यामुळे आगामी लोहा कंधार विधानसभेची निवडणूक सेवा जनशक्ती पार्टीकडून लढवणार असल्याची घोषणा सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांनी केले असून लोहा कंधार विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.या वेळी पुढे बोलताना प्रा.मनोहर धोंडे म्हणाले की मी गेली ३९ वर्षे शिवसेनेचे एक निष्ठेने काम केलो.मी जवळपास २९ वर्षापासून शिवा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक म्हणून महाराष्ट्रा सह पाच राज्यांमध्ये आणि इतर देशांमध्ये काम केलो.
परंतु राजकीय वारसा नसल्यामुळे मला प्रस्थापित पक्षाने दुय्यम स्थान दिले. यामुळे सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना केली असल्याचे यावेळी प्रा मनोहर धोंडे यांनी बोलले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सेवा जनशक्ती पार्टीने महाविकास आघाडीला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून लोहा कंधार विधानसभेची जागा ही सेवा जनशक्ती पार्टी देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे आगामी लोहा कंधार विधानसभेची निवडणूक सेवा जनशक्ती पार्टी कडून लढविणार असल्याची घोषणा प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.
लोहा कंधार विधानसभेचे निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे सांगितले.दि.१ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या जनसंवाद कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून कलंबर (बु ) चे तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबु अण्णा गोरे, लोहा तालुका अध्यक्ष गोविंद हबगुंडे कंधार तालुका अध्यक्ष प्रल्हाद पा घोरबांड, शहराध्यक्ष मयुर नळदकर, विठ्ठल ताकबिडे, उमाकांत शेट्टे,हाजी शेख हैदरसाब, शेख हब्बुभाई, शिवानंद महाराज, सदाशिव गुंडे आदींसह गावाचे नागरिक व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.