भदंत पंयाबोधी शांततेचे अग्रदूत – श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड| शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांसह धम्मगुरु भदंत पंयाबोधी थेरो यांनी मोलाची भूमिका निभावलेली आहे. अनेक वेळा शांतता कमिटीचे सदस्य या नात्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे. बुद्ध विचारांचा प्रचार आणि प्रसार करतांना आजच्या काळातील ते शांततेचे अग्रदूत बनले आहेत, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.

यावेळी भदंत पंयाबोधी थेरो व भिक्खू संघासह आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम, शास्त्रज्ञ डॉ. सिद्धार्थ जोंधळे, रमेशदादा सोनाळे, बापुराव गजभारे, देवराव खंदारे, डॉ. गंगाधर सोनकांबळे, प्रफुल्ल सावंत, प्रभू सावंत, इंजि. भरतकुमार कानिंदे, गोविंद दळवी, इंजि. प्रशांत इंगोले, विनायक गजभारे, कैलास सावते, सुभाष रायबोले, संदिप सोनकांबळे, विठल गायकवाड, उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे, एस. एन. गोडबोले आदींची उपस्थिती होती. येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांच्या वाढदिवसा निमित्त खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात तमाम बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी भदंत पंयाबोधी थेरो हे बुद्धभूषण आहेत अशी मांडणी केली.

यानिमित्ताने श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात विविध प्रकारच्या २००० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येऊन सर्व झाडांच्या वृक्षारोपणासह संवर्धनाचीही जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात शंभराहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. अनेक उपासक उपासिका तसेच सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील नेते तथा कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी दान पारमिता कार्यक्रम, भोजनदान, गाथापठण आदी कार्यक्रमही संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि अभिवादन करण्यात आले. त्रिसरण पंचशील, त्रिरत्न वंदना, ध्यानसाधना, बोधीपुजा, परित्राण पाठ घेण्यात आली. विविध ठिकाणी रक्तदानास सुरुवात झाली. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर तसेच बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. विविध ठिकाणांहून उपस्थित झालेल्या कवी, गायक व शाहिरांकडून बुद्ध भीम गितांची मेजवानी देण्यात आली. अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचा कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button