नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आषाढी एकादशी निमित्त “निर्भया वारी” चे आयोजन करण्यात आले होते. या निर्भया वारीतून बालक, पालक व समाजामध्ये विविध विषयाबाबत जनजागृती करण्यात आली, रैलीस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हिरवी झंडी दाखवून सुरुवात केली. (Nanded District Police Force organizes “Nirbhaya Wari” on the occasion of Ashadhi; Students participate enthusiastically) वारीतील विद्यार्थ्यांचे कलागुण सादरीकरणाने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.



जिल्हा पोलीस दलाकडून सामाजिक बांधिलकी म्हणुन मिशन सहयोग अंतर्गत 08 नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी “मिशन निर्भया” मध्ये शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बैंड टच, बाबत माहीती, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, नैतिकता ई. तसेच “मिशन समाधान” या मध्ये महिलांच्या व विद्यार्थिनीच्या सुरक्षितसेसाठी “QR” कोड आधारित तक्रार नोंदणी सुविधा, याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र असे नाविण्यपुर्ण उपक्रम राबवण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. अंतिम टप्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ, Subject/Faculty Expert यांचे पॅनल डिस्कशन असणार आहे.


दिनांक 04 जुलै रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून नांदेड जिल्हा पोलीस दलाकडून चालू असलेले “मिशन निर्भया” व “मिशन समाधान” अंतर्गत शालेय विदयार्थी व बालकांकरीता निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमा अंतर्गत श्री, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांचा मानस होता की, शालेय विदयार्थी व बालक यांना त्यांच्या शाळा, शिकवणी वर्ग वाच्या व्यस्ततेमुळे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कर्तव्यामुळे ब-याच वेळेस पंढरपूरच्या वारीमध्ये सहभाग नोंदविता येत नाही. तसेच सदर निर्भया वारीव्दारे बालक, पालक व समाजामध्ये विविध विषयाबाबत जनजागृती व्हावी म्हणून निर्भया वारीचे आयोजन करण्यात आले होते.


सदर निर्भया वारीस महात्मा फुले पुतळा आय.टि. आय. चौक येथून अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यामध्ये शहरातील विविध शाळा महात्मा फुले, विजयनगर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हायस्कूल बाबानगर, गुजराती हायस्कूल, गुरूकुल, चैतन्या ई-टेक्नो स्कूल, केंद्रीय विदयालय, स्टुडंट पोलीस कॅडेट, 52 बटालियनचे NCC कैडेटस, श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था असे जवळपास 1500 विदयार्थानी विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी पेहराव करून, टाळ-मृदंग, चिपळ्या, भजन-किर्तनाचा जयघोष करत मोठ्या उत्साहामध्ये सहभाग नोंदविला. यामध्ये चिमुकली विठ्ठल-रुक्मिणी व लहान वारकरी विशेष आकर्षण ठरले होते. तसेच अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड व श्रीमती डॉ अश्वीनी जगताप यांनी विदयार्थामध्ये वारकरी फुगडीचा फेर धरला तसेच टाळ वाजवून साद दिली. पोलीस मुख्यालय येथील नवप्रशिक्षीत पोलीस व दंगल नियत्रंण पथक यांनी देखील टाळ वाजवून सहभाग नोंदविला.





