Nirbhaya Wari : नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आषाढी निमित्त “निर्भया वारी”; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आषाढी एकादशी निमित्त "निर्भया वारी" चे आयोजन करण्यात आले होते. या निर्भया वारीतून बालक, पालक व समाजामध्ये विविध विषयाबाबत जनजागृती करण्यात आली, रैलीस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हिरवी झंडी दाखवून सुरुवात केली. (Nanded District Police Force organizes "Nirbhaya Wari" on the occasion of Ashadhi; Students participate enthusiastically) वारीतील विद्यार्थ्यांचे कलागुण सादरीकरणाने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.
जिल्हा पोलीस दलाकडून सामाजिक बांधिलकी म्हणुन मिशन सहयोग अंतर्गत 08 नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी "मिशन निर्भया" मध्ये शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बैंड टच, बाबत माहीती, अंमली पदार्थाचे द...
