नांदेडक्राईम

illegal sand mining : मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई : अवैध रेती उत्खनन प्रकरणात 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त

महसूल पथकासोबत संयुक्त कारवाई; पाच लोखंडी हॉपर ज्यास , एक जेसीबी आणि 35 ब्रास रेती जप्त

नांदेड| जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उत्खनन प्रकरणात तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 17 मार्च रोजी सायंकाळी 6.27 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुदखेड शहरातील गोदावरी नदीपात्र परिसरात छापा टाकला. यावेळी नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच हॉपर ज्यास ट्रक, एक इंजिन बोट मशीन आणि 35 ब्रास रेती साठा असा एकूण 1,31,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दिगंबर पाटील करडिले , बालाजी सुपरे, ज्ञानेश्वर आनंदा मस्के, गजानन करडिले आणि करण मोरे, छगन भूख्तरे, देवानंद दूधमल, या सात जणांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मुदखेड पोलीस पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई पार पाडली. अवैध रेती उत्खननाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button