illegal sand mining : मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई : अवैध रेती उत्खनन प्रकरणात 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड| जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी महसूल पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उत्खनन प्रकरणात तब्बल 1 कोटी 31 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 17 मार्च रोजी सायंकाळी 6.27 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुदखेड शहरातील गोदावरी नदीपात्र परिसरात छापा टाकला. यावेळी नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच हॉपर ज्यास ट्रक, एक इंजिन बोट मशीन आणि 35 ब्रास रेती साठा असा एकूण 1,31,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी दिगंबर पाटील करडिले , बालाजी सुपरे, ज्ञानेश्वर आनंदा मस्के, गजानन करडिले आणि करण मोरे, छगन भूख्तरे, देवानंद दूधमल, या सात जणांविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...
