नांदेडराजकीय

Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धनमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी दि. २० जानेवारी रोजी साय ५ वा देव दर्शन दौऱ्याच्या निमित्यांने माहूर दौऱ्यावर होत्या.

IMG 20250121 WA0006 Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर प्रथमच माहूर दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी शहरातील टी पॉइंट येथे फटाक्याच्या आतषबाजी करीत व जेसीबी ने फुले उधळून भव्य स्वागत केले. त्यांनी दत्तशिखर येथे दत्तप्रभूचे दर्शन घेतले व कुलदेवता रेणुकामातेच्या मंदिरात महाआरती करून ओटी भरली व रेणुकामातेचे मनोभावे दर्शन घेतले संस्थानच्या वतीने विश्वस्थ संजय काण्णव, दुर्गादास भोपी, अरविंद देव यांनी स्वागत केले.

IMG 20250121 WA0004 Pankaja Munde Visit Mahur ; मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन

यावेळी आ. भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, , प्राचार्य माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, गोपू (सागर)महामुने नगरसेवक, भाजयुमो तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, अनिलजी वाघमारे,तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, संजय राठोड, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, रामेश्वर मुसळे, रामकिसन केंद्रे, आदीसह अनेक समर्थक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!