क्राईमनांदेड

नांदेड शहरातील त्या घटनेत नराधमांस 7 वर्ष शिक्षा सह 5000/-रुपये दंड -NNL

नांदेड। शहरातील एका अल्पवयीन पीडित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळुन नेऊन अत्याचार केला. यासंदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक करून न्यायालयात हजर केले असता या घटनेत नराधमांस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर एम पांडे, अतिरिक्त जिल्हा न्यायालय (विशेष पोक्सो कोर्ट), नांदेड यांनी 7 वर्ष शिक्षा सह 5000/-रुपये दंड अशी शिक्षा दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी यांनी दिनांक २१.०१.२०२२ रोजी अशी फिर्याद दिली की, फिर्यादीची मुलगी पिडीत वय १४ वर्षे, आरोपी नामे संतोष मारोती भंडारे वय २४ वर्ष धंदा चालक, रा. बहादरपुरा, ता कंधार, जि. नांदेड याने पिडीतेस लग्नाचे अमीष दाखवुन विवेकनगर, नादेड येथुन पळवुन घेवुन जावुन अहमदाबाद, राज्य गुजरात येथे विमल पार्क सोसायटी, भाईपुरा कोकरा येथे किरायाने रुम करुन दि २३.०१.२०२२ रोजी रात्री १०.०० वाजताचे सुमारास आणि दि २४.०१.२०२२ रोजी रात्री सुमारे १०.०० वाजताचे सुमारास पिडीत बालीका ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील आपण लग्न करणार आहोत असे सांगुन पिडीत बालीकेवर अत्याचार केला.

यासंदर्भात फिर्यादी यांच्या तकारी वरुन आरोपी संतोष मारोती भंडारे यांच्या विरुध्द पोलीस ठाणे कंधार, यांनी गुन्हा रजिष्टर क. २५/२०२२ अनवये कलम ३६३, ३६६-अ, ३७६-वाय, जे. एन भा.दं.वि. व सह कलम ४, ५-एल, ६, ९-एल, १० पोक्सो अन्वये गुन्हा दाखल झाला. गुन्हयाचा तपास सहा. पो.नि. एन. जे.शेख यांनी करून मा. न्यायालयासमक्ष आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल केले. प्रकरणात सरकार पक्षाने ९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. तसेच गुन्हयात तपास अधिका-याने जप्त केलेले पुरावे दाखविण्यात आले.

सरकार पक्षाचा पुरावा व उभय पक्षाचा युक्तीवाद ऐकुन मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री आर एम पांडे, अतिरिक्त जिल्हा न्यायालय (विशेष पोक्सो कोर्ट), नांदेड यांनी आरोपीस दोषी ठरवुन आरोपी संतोष मारोती भंडारे यास कलम कलम ३६३, ३६६-अ. ३७६-वाय, जे, एन भा.दं.वि. व सह कलम ४. ५-एल, ६, ९-एल, १० पोक्सो अंतर्गत सात वर्ष सश्रम कारावास व ५,०००/- दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री रणजीत देशमुख यांनी काम पाहिले. सत्र न्यायालय कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पो.हे.कॉ. सादीक पटेल यांनी काम पाहिले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!