नांदेड| परिचारिका संवर्गाच्या प्रलंबीत मागणी संधर्भात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या वतीने डॉ. शंकराराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि जिल्हाधिकारी यांना काम बंद आंदोलनाचे (Maharashtra State Nurses Association in the mood of protest for pending demands of nurses) निवेदन देण्यात आले. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कापसे व तसेच रुग्णालयाच्या आशिसेविका अल्का जाधव यांना देखील काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.


बऱ्याच दिवसांपासून परिचारिकांच्या मागणीबाबत परिचारिका संघटना वेळो वेळी निवेदन देत असून, देखील प्रशासनाकडून आतापर्यंत त्यावर काहीच तोडगा न निघणाल्याने नाविलाजास्तव परिचारिका संघटना मागणी पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलनाच्या पवित्रा घेणार आहे. याबाबतचे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी वर्ग अध्यक्षा प्रतिभा वाघदरीकर, सचिव केशव जिंकलवाड, उपाध्यक्ष विलास कनसटवाड, कोषाध्यक्ष रवि शिसोदे, कार्यकारी सदस्य शुभंगी कस्तुरे, सुषमा भोसले, मंगल पांचाळ, अर्चना कंधारे, सुधीपा उपाध्याय, विश्वाम्बर वागतकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
