नांदेड| लिंबगांव पोलीसांनी अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा मारुन १० हजार २२० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीच्या अवैद्य धंदे करणाऱ्यांत खळबळ उडाली असून, लिंबगांव परिसरात अनेकांनी गाशा गुंडाळला असल्याचे दिसून येत आहे.


पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी (Oeration flush out) अंतर्गत अवैध दारुची चोरटी विक्री करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लिंबगांव हद्दीत अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केल्याने पोलीस उपनिरीक्षक निजाम सय्यद, पोहेकॉ/२६१ राजेश घुन्नर, पोकॉ/९५ मुंजाजी चौरे, पोकॉ/११३९ टाक असे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन मौजे जैतापुर येथे आकाश सखाराम इंगोले हा त्याचे घरासमोर असलेल्या पान टपरीच्या पाठीमागे देशी दारुची विक्री करीत असतांना त्याच्यावर अचानक पणे छापा मारुन त्यास पकडले.



यावेळी त्याचे जवळील कागदी पुठयात व नायलोन पिशवी मध्ये देशी दारु भिंगरी सत्रा लेबल असलेली १८० M.L. च्या सिलबंद एकुण ९६ बॉटल किमंत ६,७२०/- रुपये व देशी दारु भिंगरी संत्रा असे लेबल असलेली ९० M.L.च्या सिलबंद एकुण १०० बॉटल किमंत ३,५००/-रुपये असा एकुण १०,२२०/- रुपयेचा विना परवाना बेकायदेशीररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळुन आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र दारु बंदी कायदा कलम ६५ (E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, डॅनियन बेन, उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग नांदेड ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / एम.एन.दळवे, पोउपनि/निजाम सय्यद, पोहेकॉ/२६१ राजेश घुन्नर, पोकॉ/११३९ रितेश टाक, पोकॉ/९५ मुंजाजी चौरे यांनी पार पाडुन चांगली कामगिरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



