नांदेड। जिल्ह्यातील नेरली या गावात शेकडो जणांना पाणी पुरवठा टाकीतील पाणी प्यायल्याने विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. गावातील सार्वजानिक टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याचं समजते आहे. कालरात्री काही जणांना उटल्या , जुलाब , चक्कर, मळमळ असा त्रास होऊ लागल्याने एकएक जण रुग्णालयात दाखल होत होता. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टरांनी एक पथक गावातच पाठविले असून येथे रुग्णांवर उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.



नेरली गावात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीची स्वच्छता केले आणि वर्षापासून केल्या गेली नसल्याने पाणीपुरवठा झाल्यानंतर गावातील नागरिकांना विषबाधा झाली आहे रुग्णाला दाखला होत असल्याने आणि मोठया संख्येने रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास होतो आहे. त्यांची तपासणी करुन उपचार करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकारानंतर गावात आरोग्य पथक दाखल होऊन रुग्णाची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत.


विषबाधा होऊन जास्त त्रास होत असेलल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जात आहे. नेरली गावांतील सार्वजानिक टाकीतील पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांनी माध्यमांना सांगितले आहे. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, सध्या टाकीतून पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, टाकीची सफाई करण्यात येणार आहे. या गावात शासनाने पाच वर्षांपूर्वीच वॉटर फिल्टर योजना दिली असल्याची माहिती मिळाली. पण पाच वर्षापासून हे वॉटर फिल्टर धुळखात पडून आहे. 2022 साली जलजीवन मिशनची योजना मंजूर झाली, मात्र योजनेचा बोर्ड नुकताच गावात बसवण्यात आला कोणत्याही प्रकारचे काम गावात झालं नसल्याचं उपसरपंच यांनी सांगितले.
