श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। श्री रेणुका माता गडावर जाणार्या काही अंतराच्या रस्त्यावर बिबट्या दिसल्याने दर्शनासाठी जाणार्या भाविकात व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मध्य रस्त्यात बिबट्या दिसल्यानंतर चार चाकी वाहणाने दर्शनासाठी जाणार्या भाविकांनी त्याचा व्हिडिओ घेवून माध्यमावर प्रसारीत करत दर्शनासाठी येणार्या भाविकांना व गाव खेड्यातील नागरिकांना सावध राहण्याचे आव्हान केले.परंतु या बाबत वनविभागाला अद्याप कुठली ही माहिती नसल्याचे समजते आहे. हे विशेष.
मागील काही दिवसापासून वनविभागाच्या गलथान कारभारामुळे जंगलातील हिंस्ञ प्राणी मानव वस्तीकडे धाव घेत आहे.शहराच्या विविध भागात बिबट्यांचे वास्तव्य कायम असून,वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.तेव्हा वरीष्ठ अधिकार्यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची मागणी आता नागरिकातून केली जात आहे.
माहूर हे जंगल व्याप्त भाग असलेल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे,झुडपे असल्याने याठिकाणी बिबट्यासह हिंस्ञ प्राण्याचे हक्काचे ठिकाण आहे. त्यातच जंगलातील पाणवट्याची संख्या नसल्यात जमा असून त्यातील काही पाणवट्यात पाणी नसल्याने पाण्या अभावी जंगली प्राणी शहरासह गाव,वस्तीकडे धाव घेत आहे.दि.९ जानेवारी रोजी श्री रेणुका माता गडावर जाणार्या रोडच्या मध्यभागी बसलेला बिबट्या चार चाकी वाहणाने प्रवास करणार्या नागरिकांना निदर्शनास आल्या नंतर काहींनी त्याची छबी मोबाईलमध्ये टिपून माध्यमावर टाकल्याची माहिती समोर येत आहे.
माहूर शहरातील अनेक भागात पाळीव प्राणी, कुत्रे, डुक्कर, कोंबड्या अशा जनावरांचे बिबट्यांला खाद्य मिळत असल्याने बिबट्यांचा मुक्काम सध्या शहरालगत असलेल्या जंगली भागात असल्याची माहिती आहे. सायंकाळी अंधार होतात नागरिकही आता घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.अशातच येथील वन विभाग जनहिताच्या फायद्याची नसल्याने तालुक्यातील जणता वैतागली असून या भैर्या, अंधळ्या,मुक्या वन विभागाची वरीष्ठांनी कान उघडणी करुण मोकाट फिरणार्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकातून केली जात आहे.